Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत आगमन

राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांकडून स्वागत

मुंबई | फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शिष्टमंडळासह आगमन झाले. यावेळी विमानतळावर उपस्थित मान्यवर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रान यांचे स्वागत केले.

हेही वाचा      :        ‘शिवशंभो गर्जना’ कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा दिमाखदार शुभारंभ

यावेळी मुख्य सचिव, राजेश अग्रवाल, पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस आयुक्त देवेन भारती, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अमित कुमार, राजदूत संजीव कुमार सिंगला, पश्चिम युरोपीय विभाग अतिरिक्त सचिव पीयूष श्रीवास्तव, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ राजेश गवांदे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

येथून फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शिष्टमंडळासमवेत हॉटेल ताज महलकडे प्रयाण केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button