Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

स्थानिक निवडणुकीच्या रणधुमाळीत 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या….

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशानुसार, सध्या पुण्यातील यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत असलेले त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्णी यांच्यासोबतच राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –  मुंबई विमानतळ उद्या ६ तास राहणार बंद; नेमकं कारण काय…? वाचा सविस्तर

या’ अधिकाऱ्यांची झाल्या बदल्या..

-राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

-प्रकाश खपले आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

-डॉ. मंजिरी मानोलकर व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

-त्रिगुण कुलकर्णी उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची अध्यक्ष, एसएससी आणि एचएससी बोर्ड, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

-अंजली रमेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button