Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील २४ अधीक्षकांच्या बदल्या; मुंबईतही नव्या उपायुक्ताची नियुक्ती 

मुंबई : राज्यातील २४ पोलीस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहविभागाने याबाबतचे आदेश सोमवारी जारी केले. आदेशानुसार एका उपायुक्ताची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार, विनायक लगारे यांना पदोन्नती देऊन मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. याशिवाय आणखी पाच अधिकाऱ्यांना अक्षीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहेत. तसेच त्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहेत. त्यात पदोन्नतीनंतर प्रदीप इंगळे व कृष्णात पिंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, मंगेश चव्हाण यांची पोलीस अधीक्षक (लातूर), अभिजीत धाराशिवकर यांची गुन्हे अन्वेषण विभाग (नागपूर), पद्मजा चव्हाण यांची राज्य राखीव पोलीस दल (अहिल्यानगर) या पदावर बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याची केंद्राकडे मागणी

योगेश चव्हाण यांची राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), अशोक थोरात यांची अपर पोलीस अधीक्षक (यवतमाळ), अमोल झेंडे यांची दक्षता अधिकारी (पुणे महानगर विकास प्राधिकरण), सागर पाटील यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था,मुंबई), स्मीता पाटील यांची पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, जयंत बजबळे यांची पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, ठाणे), सुनील लांजेवार यांची उपायुक्त राज्य गुप्तवाप्ता विभाग (संभाजी नगर), जयश्री गायकवाड पोलीस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर), रत्नाकर नवले पोलीस उपायुक्त (संभाजी नगर), प्रशांत बच्छाव यांची पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, नाशिक), नम्रता पाटील यांची पोलीस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे), अमोल गायकवाड यांची पोलीस अधीक्षक (बुलढाणा), पियुष जगताप यांची समादेशक राज्य राखीव पोली दल (चंद्रपूर), बजरंग बनसोडे यांची पोलीस अधीक्षक दहशतवादी विरोधी पथक (संभाजी नगर), ज्योती शिरसागर यांची पोलीस नागरी संरक्षण (कोल्हापूर), सोमनाथ वाघचौरे यांची पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) पदी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाने सोमवारी जारी केले. याशिवाय पोलीस उपायुक्त (नागपूर शहर) विजय कबाडे व पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, ठाणे) दीपक देवराज यांना विद्यमान पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button