breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर!

SSC-HSC Board Exam 2023-24 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत तर दहावीच्या परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहेत.

महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? भाजपा नेत्याचा सवाल 

इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते गुरूवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक २ नोव्हेंबर २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button