breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महादेव जानकर यांचा भाजपला इशारा; म्हणाले, आमचा विचार केला नाही, तर..

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता शिंदे गट आणि अपक्ष आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे.

महादेव जानकर म्हणाले की, जनतेने खऱ्या माणसाला आणि पक्षाला मत दिलं पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी ही यात्रा सुरू केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) लोकसभेला जागा दिल्या नाही, तर एकला चलोरेची भूमिका घेणार आहे. भाजपा आणि काँग्रेसवर किती दिवस अवलंबून राहायचं. आपला पक्ष वाढवण्याची गरज आहे.

हेही वाचा – भोसरीत आमदार महेश लांडगे यांची ‘आखाड पार्टी’ जोरात!

लोकसभेच्या ४८ मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. मी परभणी, माढा, बारामती आणि उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथून लढण्याची तयारी केली आहे. मी आणि रत्नागर गुट्टे विधानसभेला निवडून आलो होतो. भाजपाने आम्हाला लोकसभेला जागा दिल्या नाही, तर ४८ जागा लढणार आहे, असंही महादेव जानकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button