breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार? महादेव जानकरांची सूचक प्रतिक्रिया

पुणे | माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशात महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणीक लढवण्याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर महादेव जानकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

महादेव जानकर म्हणाले की, इंतजार का फल मीठा होता है. शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. माढा मतदारसंघातील मतदानाला अजून अवधी असल्यामुळे कशी प्यादी सरकतात? त्या दृष्टीने आमची योजना सुरू आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वादच अंतिम असून याबाबत आता बोलणे योग्य नाही.

हेही वाचा    –    शरद पवारांच्या भगिनी सरोज यांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाल्या.. 

माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघांतील शेतकऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत आणि शिक्षकांपासून ते पत्रकारांपर्यंत दररोज जवळपास एक हजार फोन येतात. आम्ही महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या. मात्र, तीनपैकी दोन मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे, असंही महादेव जानकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button