Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इस्लामाबाद चर्चेनंतर अमेरिकेची कडक कारवाई; इराणविरोधात समुद्री नाकेबंदी जाहीर

US Blockade Iran Ports | इस्लामाबाद येथे झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या युएस सेंट्रल कमांडने (CENTCOM) घोषणा करत १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून इराणच्या बंदरांमध्ये ये-जा करणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीवर नाकेबंदी लागू केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सेंटकॉमच्या माहितीनुसार, ही नाकेबंदी इराणच्या बंदरांमध्ये आणि किनारी भागात प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर निःपक्षपातीपणे लागू असेल. अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातातील इराणच्या सर्व बंदरांचा या निर्णयात समावेश करण्यात आला आहे. मात्र, इतर देशांच्या बंदरांकडे जाण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या जहाजांच्या नौकानयन स्वातंत्र्यात कोणताही अडथळा आणला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा      :              सुरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरेंसह बॉलीवूड कलाकारांंनी घेतलं अंत्यदर्शन

याशिवाय, व्यावसायिक नाविकांना औपचारिक सूचनेद्वारे अधिक माहिती दिली जाणार असून ‘नोटीस टू मरीनर्स’कडे लक्ष ठेवण्याचे आणि ओमानचा आखात तसेच होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात असताना ‘ब्रिज-टू-ब्रिज चॅनेल १६’वर अमेरिकन नौदलाशी संपर्क साधण्याचे आवाहन सेंटकॉमकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कठोर इशारा देत होर्मुझ सामुद्रधुनीत इराणला कोणतेही शुल्क दिलेल्या जहाजांना अडवण्याचे निर्देश अमेरिकन नौदलाला दिल्याचे सांगितले. “जगातील सर्वोत्तम असलेल्या अमेरिकन नौदलाला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात अशा जहाजांचा शोध घेऊन त्यांना रोखण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेला तात्काळ प्रभावाने सुरुवात होईल,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button