Gold Rate Today | सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, दागिने खरेदी करणाऱ्यांची उडवली झोप

Gold Rate Today | अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉर, जागतिक व्यापार तणाव आणि अनेक देशांमध्ये सोन्याच्या साठ्यात वाढ या कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. याशिवाय अक्षय्य तृतीयेचा सण अगदी तोंडावर असल्याने आता सोन्याचे भाव आणखी वाढणार आहे. धनत्रयोदशी किंवा लग्नसराईसारख्या सणांमध्ये मोठी मागणी असल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव येताना दिसत आहे.
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे भाव १,००,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाजही वर्तवला जात आहे. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९८,२४० रुपये इतकी आहे. सोन्याचा भाव अक्षय्य तृतीयेपूर्वी काल घसरलेला दिसत आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ९०,०५० इतकी आहे. अक्षय्य तृतीये सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा : आमदार शंकर जगताप यांच्या मदतीने श्रीनगरमध्ये अडकलेले १४ प्रवासी सुखरूप पिंपरी-चिंचवडला परत
सोन्याची दरवाढ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर वाढत असून MCX वर, फेब्रुवारी सोन्याचा वायदा सकाळी ११५० पयांच्या वाढीसह ९५,८३८ रुपयांवर पोहोचला, जो शेवटच्या सत्रात रु. ९४,७२२ वर क्लोज झाला आणि आज रु.९५,५८० वर उघडला. चांदीचे दरातही आज वाढ झालेली पाहायला मिळाली. चांदीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. प्रति किलो चांदीची किंमतही १,००,९०० रुपये आहे.