आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इराण शक्तीहीन…! युद्धाच्या पहिल्या दिवसांत डागत होता शेकडो मिसाईल, ड्रोन

युद्धाच्या १५ व्या दिवशी इराणच्या हल्ल्यांची धार कमी झाली

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमतेबाबत एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेने इराणचे सुमारे ९०% क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जात असला तरी, इराणची ‘हल्ला करण्याची क्षमता’ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा ; धर्मांतरबंदी विधेयक मंजूर; ठाकरे गटाचे समर्थन, समाजवादी पक्षाचा विरोध

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या प्रमुख क्षेपणास्त्र तळांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तळांचे नुकसान झाले असले तरी, इराणकडे अद्याप हजारो ‘सुसाईड ड्रोन’ शिल्लक आहेत, जे शोधणे आणि रोखणे कठीण आहे.

मोबाईल लाँचर्स

इराणने आपले अनेक लाँचर्स आता ‘मोबाईल युनिट्स’मध्ये (ट्रकवरून डागता येणारी क्षेपणास्त्रे) रूपांतरित केले आहेत, जे सतत जागा बदलत असल्याने नष्ट करणे आव्हानात्मक ठरत आहे. इराणने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हे सिद्ध केले आहे की त्यांची ‘प्रिसिजन गाईडेड’ यंत्रणा पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाली आहे.

इस्रायल आणि अमेरिकेची रणनीती

इस्रायलच्या आयर्न डोम आणि ॲरो-३ यंत्रणेने इराणचे ९९% हल्ले रोखल्याचा दावा केला आहे. मात्र, इराण जर ‘स्वॉर्म अटॅक’ (एकाच वेळी शेकडो ड्रोनने हल्ला) करत राहिला, तर या संरक्षण यंत्रणांवर प्रचंड ताण येऊ शकतो, असा इशारा अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिला आहे.

आकडेवारी काय सांगतेय

पेंटागन आणि विविध संरक्षण संस्थांच्या ताज्या आकडेवारीनुसार, इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या तीव्रतेत प्रचंड घसरण झाली आहे. युद्धाचा पहिला दिवस (२४ तास) इराणने यूएईवर १६७ क्षेपणास्त्रे (बॅलिस्टिक आणि क्रूझ) आणि ५४१ ड्रोन्स डागले होते. युद्धाचा १५ वा दिवसाला हा आकडा कमालीचा घटून केवळ ४ क्षेपणास्त्रे आणि ६ ड्रोन्स इतकाच मर्यादित राहिला आहे. इस्रायलवर दररोज सरासरी १०० क्षेपणास्त्रे डागली जात होती. आता ही संख्या सिंगल डिजिटमध्ये (१० पेक्षा कमी) आली आहे, असे इस्रायलच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज’ने म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button