अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर विधेयक २०२५ मागे घेतलं; लवकरच नवीन विधेयक सादर होणार

Income Tax Bill : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर विधेयक २०२५ हे विधेयक शुक्रवारी मागे घेतलं असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार आता नवीन आयकर विधेयक २०२५ हे संसदेत ११ ऑगस्ट रोजी सादर करणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. या विधेयकात निवड समितीने सुचवलेल्या बदलांचा समावेश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवीन आयकर विधेयक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर निवड समितीने २१ जुलै रोजी या विधेयकासंदर्भातील अहवाल सादर केला होता. त्यामुळे आता या नवीन आयकर विधेयकात निवड समितीने सुचवलेल्या बहुतेक शिफारशींचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
हेही वाचा – पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू….
“आयकर विधेयकाच्या अनेक आवृत्त्यांमुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी आणि सर्व बदलांसह एक स्पष्ट आणि अपडेटेड विधेयक असण्यासाठी आणि निवड समितीने सुचवलेल्या बहुतेक शिफारशींच्या समावेशासह नवीन आयकर विधेयक संसदेत सादर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी सांगितली आहे. जुन्या १९६१ च्या आयकर विधेयकाची जागा घेणारे आयकर विधेयक हे १३ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर ते छाननीसाठी निवड समितीकडे पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, आता हे विधेयक मागे घेण्यात आलं आहे.
दरम्यान, निवड समितीत ३१ सदस्य आहेत आणि या समितीचे अध्यक्ष भाजपा नेते बैजयंत पांडा आहेत. नवीन कायद्यात धार्मिक-सह-धर्मादाय ट्रस्टला दिलेल्या देणग्यांवरील कर सूट सुरू ठेवण्यास अनुकूलता दर्शविण्यात आलेली आहे. तसेच करदात्यांना आयटीआर दाखल करण्याच्या अंतिम तारखेनंतरही दंडात्मक शुल्क न भरता टीडीएस परतावा मिळण्याची परवानगी मिळण्यासाठी काही बदल सुचवलं असल्यासं सांगितलं जातं.





