Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

तेहरानवर भीषण हल्ला; अनेक वरिष्ठ लष्करी नेते ठार, ट्रम्प यांचा दावा

US Iran War | पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र होत असताना अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी यासंदर्भातील एक मिनिट सात सेकंदांचा व्हिडिओही शेअर केला असून, त्यामध्ये स्फोटांच्या ज्वालांनी तेहरानचे आकाश उजळून निघाल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी नेते ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

हा हल्ला ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर झाल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी इशारा दिला होता की, जर इराणने वॉशिंग्टनसोबत करार केला नाही किंवा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली नाही, तर इराणला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानली जाते.

हेही वाचा        :                    सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

दरम्यान, गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात अमेरिकेला प्रथमच मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला असून, या घटनेनंतर अमेरिकेचा एक क्रू सदस्य शत्रूच्या हद्दीत बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी अमेरिकन लष्कराने उच्च-जोखमीची विशेष मोहीम सुरू केली आहे.

लष्करप्रमुखांना हटवले

युद्धभूमीवरील या घडामोडींमुळे वॉशिंग्टनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ पदावरून पायउतार होऊन निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. या तडकाफडकी निर्णयाचे कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही, मात्र युद्ध संचालनावरून ट्रम्प प्रशासनावर होणाऱ्या टीकेचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button