Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत कोसळली

Gujarat Bridge Collapse | गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील पादरा तालुक्यातील महिसागर नदीवरील गंभीरा पुलाचा काही भाग बुधवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत किमान १० जण जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. पूल कोसळल्यानंतर अनेक वाहने नदीत कोसळली, ज्यात दोन ट्रक, एक ईको व्हॅन, एक पिकअप व्हॅन आणि एक ऑटोरिक्षाचा समावेश आहे.

ही घटना पादरा-मुजपूर मार्गावरील गंभीरा पुलावर घडली, जो वडोदरा आणि आनंद जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाचे बांधकाम १९८५ मध्ये झाले होते, आणि स्थानिकांनी यापूर्वीच पुलाची दुरवस्था आणि धोकादायक स्थिती याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

हेही वाचा     :      महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, पूल कोसळण्यापूर्वी मोठा आवाज आला आणि काही क्षणातच पूलाचा स्लॅब कोसळला, ज्यामुळे त्यावरून जाणारी वाहने नदीत पडली. घटनास्थळी स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. वडोदरा जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. आतापर्यंत ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, त्यापैकी ४ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button