टेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ऑल’

अमित शेळके | प्रतिनिधी

Artificial Intelligence | गेल्या काही दिवसांमध्ये-वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुध्दिमत्तेचा सर्वत्र वापर वाढलेला आहे. अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेचा फायदा होणार असून त्याचे काही तोटे देखील आहेत. 2025 हे वर्ष कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial intelligence) वर्ष म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (All India Council for Technical Education ) 2025 हे वर्ष कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial intelligence) वर्ष म्हणून जाहीर केले. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारताला अग्रस्थान मिळवून देणे हा आहे.

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या नियोजनामध्ये देखील एआयचा वापर करण्यात आला आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी कुंभ सहाय्यक AI चॅटबॉट तयार करण्यात आले आहे. हा चॅटबॉट भाविकांना आणि पर्यटकांना त्यांच्या प्रवासादरम्यान उपयुक्त माहिती पुरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन बनले आहे. महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना वाहतूक मार्ग, पार्किंग सुविधा, आणि रस्त्यावरील गर्दीच्या स्थितीबद्दल एआय माहिती देत आहे. प्रमुख गोष्ट म्हणजे एआय हे बहुभाषिक असून हिंदी, मराठी, इंग्रजी यासह अनेक भाषांमध्ये संवाद साधू शकते.

Artificial Intelligence for All

कृत्रिम बुध्दीमत्तेच्या भारतातील विकासाकरिता आणि सुयोग्य वापरासाठी देशभरात प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया एआय मिशन’ (India AI Mission Policy) ला मंजुरी दिली. ‘इंडिया एआय मिशन अंतर्गत भारतामध्ये एआय क्षमता वाढविण्यासाठी 10,372 कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. याप्रमाणेच महाराष्ट्राचे एआय धोरण (AI Policy) तयार करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे एआय वापराला गती देण्यासाठी नव्या धोरणाची निर्मिती करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजियन्स आधारित उद्योगांच्या वेगवान वाढीसाठी आणि योजना तयार करण्यासाठी तसेच परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. डिजिटलाझेशनानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेमध्ये दिशादर्शक होण्यासाठी महाराष्ट्र राज्याने हे पाऊल उचलले आहे, असं राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Artificial Intelligence for All

कृषी, आरोग्य, शिक्षण विशेषता मीडिया या क्षेत्रांवर देखील एआयचा मोठा परिणाम होत असून स्टार्टअप्स आणि उद्योगात देखील एआयचा वापर वाढला आहे. विविध वाहिन्यांवर कृत्रिम अँकर देखील आपण पाहिले असतील. त्याचप्रमाणे एआयच्या मदतीने बारामतीमध्ये कमी खर्चात ऊसाचे अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजियन्स तंत्रज्ञानाद्वारे कृषि विज्ञान केंद्रामध्ये वॉर स्थापन करण्यात आली आहे. ऊसाच्या अधिक उत्पन्नासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी कळण्यासाठी वातावरणानुसार काय बदल करावेत हे एआय अचूकपणे सांगत आहे. यामुळे शेती करण्याच्या पध्दतीमध्ये भविष्यात अमूलाग्र बदल घडणार आहेत. यासोबतच कौशल्य विकास, स्टार्टअप इनोव्हेशन यामध्येही एआयचा वापर होत आहे. एआयमुळे पोलीसांना गुन्हेगार लवकर शोधण्यासाठी देखील मदत होत आहे. शासन आणि प्रशासन अर्थात नोकरशाहीची कामे सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी ते सार्वजानिक सुरक्षेसाठी देखील एआयचा वापर करण्यात येत आहे. त्यासोबतच सरकारी योजना, कृति कार्यक्रम आणि निर्णयांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमपणे आणि पारदर्शीपणे करण्यासाठी एआय उपयोगी ठरत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामांमध्ये सुलभता निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग होत आहे. विविध संशोधनामध्ये 2029 पर्यंत एआय आधारित लाखो रोजगार निर्माण होतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एआयमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी कौशल्य विकास आवश्यक असणार आहे. राज्य सरकार या दृष्टीने पाऊले उचलत आहे.

Artificial Intelligence for All

एआयचे धोके :

  • आधुनिक तंत्रज्ञान वापरत असताना काही चांगल्या बाबी फायदे करून देतात. मात्र, याबरोबरच त्याचे काही तोटे देखील असतात.
  • अनेक प्रश्नांची उत्तरे चाट जीपीटी अगदी सहजतेने देत आहे. यामुळे मुलांच्या विचार क्षमतेवर नकारात्मक परिणाम होत आहेत.
  • एआयवर अवलंबून राहिल्यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.
  • एआयच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या विचार क्षमता आणि आकलन क्षमता कमी होत असल्याचा निष्कर्ष काही संशोधनांमधून काढण्यात आला आहे.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button