Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

ULLU, ALTBalaji सह 25 अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सवर अश्लील कॉन्टेंटमुळे बंदी

ULLU, ALTBalaji | केंद्र सरकारने अश्लील, आक्षेपार्ह आणि प्रौढांसाठी असलेला कॉन्टेंट प्रसारित केल्याच्या आरोपांवरून 25 अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. यामध्ये ULLU, ALTBalaji, Desiflix, Big Shots, Boomex, Navarasa Lite आणि Gulab App यांसारख्या प्रमुख डिजीटल प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिजीटल माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अश्लील कॉन्टेंटचा प्रसार रोखण्यासाठी ही कठोर कारवाई केली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे प्लॅटफॉर्म्स माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. या अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सवर कामुक वेब सिरीज आणि प्रौढांसाठी कॉन्टेंट प्रसारित केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे सरकारने इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) या सर्व प्लॅटफॉर्म्सचा देशभरातील अ‍ॅक्सेस तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा      :      ‘चार नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई होणार’; संजय राऊतांचा धक्कादायक दावा

यापूर्वी मार्च 2025 मध्येही सरकारने अशाच प्रकारे 19 वेबसाइट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घातली होती. या कारवाईचा उद्देश डिजीटल प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारित होणाऱ्या सॉफ्ट पॉर्न आणि आक्षेपार्ह सामग्रीवर नियंत्रण ठेवणे हा आहे. मंत्रालयाने याबाबत कठोर धोरण अवलंबण्याचे संकेत दिले असून, भविष्यातही अशा प्लॅटफॉर्म्सवर कायदेशीर कारवाई सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.

ही कारवाई सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काहींनी यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तरीही, केंद्र सरकारने समाजातील नैतिक मूल्यांचे रक्षण आणि डिजीटल प्लॅटफॉर्म्सच्या जबाबदारीवर भर दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button