breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एल्विश यादववरून जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, हा महाराष्ट्राचा अपमान!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बॉलीवुडसह अनेक कलाकारांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर आणि बीग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादव हा देखील होता. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. या पोस्टबरोबर एल्विशचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. एल्विश यादव सारख्या कुप्रसिद्ध यूट्यूबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा – World Cup 2023 : आज पुण्यात निघणार ‘वर्ल्ड कप ट्रॉफी’ची भव्य मिरवणूक

महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक विधानं केली आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो. बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं असं हा म्हणतो. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकरसाहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराचं जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

जितेंद्र आव्हाडांनी एल्विश यादवचा एक व्हिडीओ पोस्ट केलेल्या आहे. यामध्ये तो, मुलींनी फार विचार न करता घरातली कामं करावीत, आधीच कमी असणारी बुद्धी फार वापरू नये, फार विचार करू नये अशी विधानं करताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button