breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची हाऊस फुल्ल गर्दी!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरणावर विकेंडमुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

लोणावळ्यातील भुशी धरणासह लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भुशी धरण, टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट धुक्यात हरवल्याचे चित्र होतं. या धुक्याचा आनंद घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. दरम्यान लोणावळ्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा – प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपये मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

भुशी धरणात काही पर्यटक जीव धोक्यात घालून पोहोत होते. काही पर्यटक जीवावर बेतणारे पर्यटन करत आहेत. असं असलं तरी भुशी धरणावर लोणावळा शहर पोलीस दिसले नाहीत. पर्यटकांनी अशा प्रकारे जीवावर बेतणारे पर्यटन करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button