breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार गटाची यादी जाहीर; सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे पहिल्या यादीत

पुणे | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. वर्धा, दिंडोरी, बारामती, शिरूर, अहमदनगर या जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. बारामतीतून सुप्रिया सुळे तर शिरूरमधून अमोल कोल्हेंना तिकीट देण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

गेल्या काही दिवसांपुर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमर काळेंना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. वर्ध्यातून अमर काळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरीतून भास्करराव भगरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. अहमदनगर मधून निलेश लंकेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा    –    ‘मराठवाड्यातील कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी एकत्र लढू’; काशिनाथ नखाते

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पहिली यादी

वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्करराव भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरुर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button