Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

गँगस्टर बनायचं होतं, मित्रांसोबत मिळून थेट..; रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात आणखी एकाला अटक, मोठा खुलासा

Rohit Shetty Residence Firing Case : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या टास्कफोर्सच्या मदतीने मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील आग्रा इथून प्रदिपकुमार रामसिंग उर्फ छोटू याला अटक केली आहे. तपासात आरोपींना या कामासाठी भरमसाठ पैशांची ऑफर देण्यात आली होती. यात प्रदीपकुमारचाही समावेश होता. प्रदीपकुमारचा सहभाग निश्चित झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत चार महिने प्रदीप कुमार फरार होता.

प्रदीप हा घरी परतणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तरप्रदेश टास्कफोर्सच्या मदतीने प्रदीपला आग्रा अशोकनगर, न्यू बस्ती पक्की तलैया इथून अटक केली. प्रदीपकुमार हा शुभम लोणकरच्या सोशल मीडियावरील बातम्या आणि पोस्ट पाहून प्रभावित झाला होता. अंडरवर्ल्डमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सनी, दीपू आणि सोनू या साथीदारांसोबत गुन्ह्यात सहभागी झाल्याचं त्याने कबूल केलं.

यापूर्वी या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली अून असून प्रदीपच्या अटकेनंतर आरोपींच्या अटकेची संख्या 9 झाली आहे. पोलीस प्रदीपकुमारची सखोल चौकशी करत असून त्याच्या माध्यमातून मुख्य आरोपी शुभम लोणकरबाबत चौकशी करत आहेत. याप्रकरणी आरोपींविरूद्ध पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. मुख्य आरोपी शुभम लोणकरचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा –  शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पीकविमा योजनेतून भरपाई मंजूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी आरोपी सिद्धार्थ येनपुरे आणि समर्थ यांनी पुण्याहून मुंबईला एक दुचाकी आणली आणि ती मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केली. हीच दुचाकी गोळीबार करणाऱ्याने वापरल्याचा आरोप आहे. गोळीबार करणारा आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवासी असून चार ते पाच साथीदारांसह तो मुंबईत राहिला होता. घटनेपूर्वी त्याने रोहित शेट्टीच्या घराची तीन ते चार वेळा पाहणी केली होती, असंही म्हटलं जात आहे.

1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू इथल्या निवासस्थानाबाहेर आरोपीने गोळीबार केला होता. चित्रपटसृष्टीत आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी तसंच पैसे उकळण्यासाठी हा गोळीबार केल्याची माहिती आहे. कुख्यात गुंड शुभम लोणकरच्या गँगच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button