विवेक अग्निहोत्री-भूषण कुमार आणताहेत ‘ऑपरेशन सिंदूर’, लष्कराच्या शौर्याची सत्य कथा!

Operation Sondoor Movie : दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि टी-सीरीजचे भूषण कुमार यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ‘टायनी’ ढिल्लों (निवृत्त) यांच्या पुस्तकावर आधारित असून, एप्रिल २०२५ च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या गुप्त आणि अचूक लष्करी कारवाईची सत्यकथा यात दाखवली जाईल.
भूषण कुमार आणि ‘द काश्मीर फाइल्स’ फेम दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून सोशल मीडियावर सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट भारतीय लष्कराच्या शौर्याची आणि एका सत्य घटनेची थरारक कथा प्रेक्षकांसमोर आणणार आहे.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते; पहा सर्व नेत्यांची यादी
निर्माता भूषण कुमार आणि चित्रपटनिर्माता विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नवीन चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. हा चित्रपट लेफ्टनंट जनरल के.जे.एस. ढिल्लन यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाईड पाकिस्तान’ या पुस्तकावर आधारित आहे. दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री करणार आहेत. २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर केलेल्या गुप्त लष्करी कारवाईची ही कथा आहे.
भूषण कुमार यांची ‘टी-सीरीज’ आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांची ‘आय ॲम बुद्धा प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नवीन चित्रपटासाठीच्या आपल्या सहयोगाची घोषणा केली आहे.





