Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘राजा शिवाजी’ चित्रपटाने सातव्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; रितेश देशमुखच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती?

Raja Shivaji Box Office Collection Day 7: १ मे २०२६ ला ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रितेशने या सिनेमाचे दिग्दर्शन तर केले आहेच, याबरोबरच तो या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसला आहे.

रितेशच्या राजा शिवाजी या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्याच्याबरोबरच राजा शिवाजी सिनेमामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार आहेत.

महेश मांजरेकर, सलमान खान, संजय दत्त, बोमन ईरानी, भाग्यश्री, अभिषेक बच्चन, दिशा परदेशी, जिनिलीया देशमुख, विद्या बालन असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता सात दिवसांत या सिनेमाने किती कमाई केली, हे जाणून घेऊ…

सॅल्कनिकनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी ११. ३५ कोटींची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशी राजा शिवाजीने १०. ५५ कोटींचे कलेक्शन केले होते. तिसऱ्या दिवशी सिनेमाने १२ कोटींची कमाई केली, चौथ्या दिवशी ५.६० कोटींची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने ४.९० कोटींची कमाई केली होती. तर सहाव्या दिवशी सिनेमाने ४.२५ कोटींची कमाई केली होती. आता सातव्या दिवशी म्हणजेच गुरूवारी ४ कोटींची कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने सात दिवसांत ५२.६५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात ७३ कोटींची कमाई केली आहे. लवकरच, हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करेल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा –  PCMC: आधी सुविधा द्या; मगच कररचनेत बदल करा!

राजा शिवाजी सिनेमातून रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांनी सिनेविश्वात पदार्पण केले आहे. रितेश देशमुखचा भाऊ धिरज देशमुखही सिनेमात दिसले आहेत. याबरोबरच, अभिषेक बच्चन, सलमान खान यांच्या भूमिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिशा परदेशी, भाग्यश्री, संजय दत्त यांच्या भूमिकाही लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक सीन व्हायरल होत आहेत. अनेकांनी सिनेमा पाहून आल्यानंतर त्यांच्या भावना काय होत्या, हे सांगितले आहे. तसेच, अनेकांनी बाल शिवाजीला पाहताना अंगावर काटा आला, अशा भावनाही व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री दिशा परदेशीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजा शिवाजी सिनेमात काम करण्याचा अनुभव सांगितला तसेच तिने कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, राजा शिवाजी सिनेमा आगामी काळात किती कमाई करणार, मराठी सिनेविश्वात कमाईचे रेकॉर्ड तयार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button