Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत

Tejashri Pradhan: मराठी मालिकांमधून आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून तिला “राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024” जाहीर झाला आहे.

सध्या तेजश्री ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत काम करत आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा –  ‘आयडॉल शिक्षक शाळेसोबतच समाजातही मोठा बदल घडवून आणतील’; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

तेजश्रीने लिहिलं,

“यश आणि अपयशासह, न थकता, न डगमगता, उरी विश्वास बाळगून आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहावं. जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो ते सर्व वेचत चालत राहावं.”

पुढे तिने लिहिले, “मग एक छानसा विसावा घ्यावा. त्यात थोडा आढावा घ्यावा. करून ठेवलेल्या गोष्टींचा, चुकलेल्याचा, बरोबर गोष्टींचा, मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमाचा, टीकेचा, आपुलकी दाखवणाऱ्या सहकलाकारांचा, हितचिंतकांचा आणि निंदकांचा. मग, अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं की तुमच्या वाटचालीवर आमचं लक्ष आहे. त्यानंतर मग मन पुन्हा एकदा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं.”

तेजश्री पुढे म्हणते, “२०२४ चा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि माननीय मंत्री आशिष शेलार यांचे मनापासून आभार.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button