Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘द केरळ स्टोरी 2’चा सॉलिड सरप्राइज; कोर्ट केस-वादविवाद झुगारून दमदार कमाई

The Kerala Story 2 : विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुनावणी झाली. त्यानंतर शुक्रवारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु शुक्रवारी फक्त हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालाच नाही तर बॉक्स ऑफिसवर त्याने दमदार सुरुवातदेखील केली आहे. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी याचे शोज रद्द होऊन आणि केरळ उच्च न्यायालयाकडून हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा करूनही पहिल्या दिवशी थिएटरमध्ये बऱ्यापैकी प्रेक्षक जमले होते. ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. केरळ राज्यात बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराचा मुद्दा पहिल्या भागात मांडण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्या भागात दुसऱ्या राज्यांमधील कथा दाखवण्यात आली आहे.

‘बुक माय शो’ या तिकिट बुकिंग अॅपच्या ट्रेंडिंग टिकरनुसार 24 तासांत (शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत) ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाचे 21 हजारांहून अधिक तिकिट विकले गेले. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ या चित्रपटाचेही इतकेच तिकिटं तिसऱ्या दिवशी विकले जात होते. ‘द केरळ स्टोरी 2’ने पहिल्याच दिवशी हा आकडा गाठला. या तिकिट विक्रीचा फायदा बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही दिसून आला.

हेही वाचा –  होळीला सरकारची मोठी भेट, गॅस सिलिंडर स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील नवे दर!

ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, ‘द केरळ स्टोरी 2’ने पहिल्याच दिवशी 3.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा आकडा जरी लहान वाटत असला तरी या चित्रपटाच्या वाटेत आलेल्या अडथळ्यांच्या तुलनेत हे एक प्रकारचं यशच आहे. गुरुवारी केरळ उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीचे आदेश दिले होते. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुन्हा अपील केलं. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे शुक्रवारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल की नाही, हे स्पष्ट झालं नव्हतं. यामुळे शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी चित्रपटाच्या तिकिटांची विक्री झाली नाही. 2023 मध्येही ‘द केरळ स्टोरी’च्या प्रदर्शनापूर्वी अशाच प्रकारे वाद झाला होता. परंतु अदा शर्माच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8 कोटी रुपये कमावले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button