Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

देव की राक्षस? नवीन क्राईम थ्रिलर सिरीज ओटीटीवर; विजय सेतुपतीचा धमाका, सस्पेन्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Kaattaan OTT Release: ओटीटीवर क्राइम थ्रिलर सिरीज आली आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आणि शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवणारी ‘काट्टान’ ही वेब सिरीज सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसत असून त्याच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

‘काट्टान’ ही सिरीज 27 मार्च 2026 रोजी JioHotstar वर रिलीज झाली आहे. वीकेंडसाठी एकदम परफेक्ट अशी ही डार्क क्राइम थ्रिलर सिरीज मानली जात आहे.

या सिरीजचा पहिला सीझन 10 एपिसोडचा आहे. प्रेक्षकांना ही सिरीज तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आणि बंगाली अशा अनेक भाषांमध्ये पाहता येते.

या सिरीजचं दिग्दर्शन एम. मणिकंदन आणि बी. अजितकुमार यांनी केलं आहे. मुख्य भूमिकेत विजय सेतुपतीसोबत मिलिंद सोमण, सुदेव नायर, कलैवाणी भास्कर, मुथुकुमार, वी.जे. पार्वती, रिशा जेकब्स आणि वडिवेल मुरुगन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा –  ‘नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली जावळीचा विकास गतिमान करू’; सैारभ शिंदे

या सिरीजची कथा मुथु (विजय सेतुपती) या पात्राभोवती फिरते. मुथु हा नेमका कोण? देव की राक्षस… हा प्रश्न संपूर्ण कथेत प्रेक्षकांना सतावत राहतो. कथेची सुरूवात ही पोलीस स्टेशनजवळ एक कापलेलं डोकं सापडतं इथून होते. या घटनेपासून एक गूढ आणि थरारक तपास सुरू होतो. ही कथा एका गावात घडते आणि यात पर्यावरणाशी संबंधित मुद्दे आणि गुन्हेगारी यांचा संगम दाखवण्यात आला आहे.

‘काट्टान’ ही फक्त क्राइम सिरीज नाही, तर ती एक सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीज आहे जी प्रत्येक एपिसोडमध्ये नवा ट्विस्ट आणते. प्रेक्षकांना शेवटपर्यंत काय होणार याची उत्सुकता कायम ठेवण्यात ही सिरीज यशस्वी ठरते.

जर तुम्हाला सस्पेन्स, थ्रिल आणि वेगळ्या कथानकाच्या सिरीज आवडत असतील, तर ‘काट्टान’ नक्की पाहण्यासारखी आहे. देव आणि राक्षस यांच्यातली सीमारेषा धूसर करणारी ही सिरीज तुम्हाला विचार करायला भाग पाडते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button