Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

पेड्डी चित्रपटात मृणाल ठाकूरचा कॅमिओ? नवीन अपडेट समोर

Mrunal Thakur : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण ‘पेड्डी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार असून, प्रेक्षक त्यासाठी खूप उत्सुक आहेत.

हा एक अॅक्शन चित्रपट असून, राम चरण दमदार भूमिकेत झळकणार आहे. आता या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे.

वृत्तानुसार, अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात एका विशेष भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, ती राम चरण आणि जान्हवी कपूरसोबत एका डान्स नंबरमध्ये दिसणार आहे. मात्र, यावर निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘पेड्डी’ या ॲक्शन चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार आहे. वृत्तानुसार, हा टीझर 27 मार्च 2026 रोजी राम चरणच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित होऊ शकतो. यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हेही वाचा –  IMD Weather Update : अवकाळी पाऊस कोसळणार, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

या चित्रपटात एका गावात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेची कथा दाखवण्यात येणार आहे. बुची बाबू सना के यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट व्यंकट सतीश किलारू आणि ईशान सक्सेना यांनी निर्मित केला आहे. चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. ‘राय राय रा रा’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, राम चरणच्या डान्सला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राम चरणच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तो शेवटचा ‘गेम चेंजर’ या चित्रपटात दिसला होता. ज्यात त्याने एका प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमाल करु शकला नाही. चाहत्यांना पेड्डी या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. तर मृणाल ठाकूर लवकरच ‘डकैत’ या चित्रपटात आदिवी शेषसोबत दिसणार आहे. शेनिल देव दिग्दर्शित हा रोमँटिक ॲक्शन चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button