सत्ता, वारसा अन् शत्रुत्वाची नशा, पुन्हा लोकांच्या मनावर राज्य करायला येतोय ‘मिर्झापूर’

Mirzapur The Movie Teaser : मिर्झापूर द मूव्ही’चा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘सब भौकाल है भाई!’ या लोकप्रिय संवादाने सजलेला टीझर सत्ता, वारसा, सूड आणि जुन्या वैराच्या नव्या संघर्षाची झलक दाखवतो. मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या कथानकाला आता मोठ्या पडद्यावर आणण्यात येत असून, चाहते पुन्हा एकदा मिर्झापूरच्या रक्तरंजित आणि थरारक दुनियेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत.
‘मिर्झापूर द मुव्ही’चा टीझर अखेर आज २५ जून रोजी दुपारी १२ वाजता प्रदर्शित करण्यात आला. सत्ता, वारसा, सूड आणि रक्तरंजित संघर्षांनी भरलेल्या या कहाणीच्या झलकने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीझर प्रदर्शित होताच सिनेरसिकांनी त्यावर कॉमेंट्स द्यायला सुरुवात केली. ‘सब भौकाल (दहशत)’ अनेकांनी टीझरचे कौतुक केले.
प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजवर आधारित हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता. टीझरची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. टीझरच्या आधी निर्मात्यांनी प्रमुख पात्रांची पोस्टर्स शेअर केली होती.
टीझर समोर आल्यानंतर मिर्झापूरच्या जगातील सत्तासंघर्षाची कथा नव्या स्वरूपात पाहायला मिळाली. २०१८ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या सीझनपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या फ्रँचायझीची कहाणी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
४ सप्टेंबर २०२६ रोजी मिर्झापूर द मुवी चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांची दमदार उपस्थिती पुन्हा पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, जितेंद्र कुमार ‘बबलू पंडित’च्या भूमिकेत दिसणार असून या लोकप्रिय पात्राचे पुनरागमन चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे. याशिवाय, रवी किशन यांचीही कथेत एन्ट्री झाली असून त्यांच्या भूमिकेमुळे कथेत नवा ट्विस्ट येणार आहे.
टीझरमधून मिर्झापूरच्या परिचित पण अधिक भव्य विश्वाची झलक दिसून येते. पूर्वांचलच्या गल्लीबोळांपासून राजस्थानच्या विस्तीर्ण वाळवंटांपर्यंत विस्तारलेली ही कथा यावेळी अधिक मोठ्या प्रमाणात साकारण्यात आली आहे. शानदार दृश्ये, दमदार डायलॉग्ज आणि प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारे कथानक ‘मिर्झापूर: द मुव्ही’ घेऊन आले आहे.





