‘हक’ ते ‘तस्करी’; ओटीटीवर पाहा इमरान खानचे ‘हे’ चित्रपट व सीरिज, कुठे पाहायचे? घ्या जाणून…

Emraan Hashmi OTT Movies List : इमरान खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अलीकडेच तो ‘तस्करी’ व ‘हक’ यांसारखे चित्रपट व सीरिजमुळे चर्चेत आहे. आज २४ मार्च (मंगळवार) रोजी अभिनेत्याचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं आम्ही तुम्हाला त्याच्या काही चित्रपट व सीरिजबद्दल सांगणार आहोत.
ओटीटी आता अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. त्यामार्फत घरबसल्या हव्या त्या कलाकृती पाहता येतात. त्यामुळे आता ओटीटी मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन बनलं आहे. प्रादेशिक भाषेत काम करणारे कलाकार ते बॉलीवूड सेलिब्रिटी सर्वांचेच चित्रपट व सीरिज आता यामार्फत रिलीज होत असतात. अशातच इमरान खानच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या अशा काही कलाकृतींची नावं सांगणार आहोत, जी तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.
इमरान खाननं आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यानं ‘हक’, ‘जन्नत’, ‘ग्राउंड झिरो’ यांसारख्या चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्याच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त सध्या ओटीटीवर त्याच्या कोणत्या कलाकृती पाहण्यासाठी उपलब्ध आहेत याबद्दल जाणून घेऊयात…
हेही वाचा – राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित; १ जानेवारी २०११ पर्यंतच्या अतिक्रमणांनाच दिलासा
हक – यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात त्यानं अब्बास हे पात्र साकारलं आहे. हा चित्रपट शाझिया बानो यांच्यावर आधारित आहे. अलीकडेच ७ नोव्हेंबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता; परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, ओटीटीवर आल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
जन्नत – हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. त्यामध्ये इमरान खाननं अर्जुन दीक्षित ही भूमिका साकारली आहे, जो पुढे जाऊन मोठा क्रिकेटपटू होतो. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
आवारापन – हा एक अॅक्शन क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. त्यामध्ये त्यानं एका नास्तिक असलेल्या गँगस्टरची भूमिका साकारली आहे, ज्याचं नाव शिवम पंडित असतं. हा खूप रंजक चित्रपट आहे, जो तुम्ही घरबसल्या अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
ग्राऊंड झिरो – हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्यामध्ये त्यानं नरेंद्रनाथ धर दुबे या बीएसएफ कमांडंटची भूमिका साकारली आहे. जो काश्मीरमधील एक दहशतवादी ऑपरेशनचं नेतृत्व करत असतो. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
हमारी अधुरी कहाणी – मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात इमरान खानबरोबर विद्या बालन झळकलेली. त्यामध्ये त्यानं अरुण रूपारेल हे पात्र साकारलेलं, जो वसुधा प्रसाद या वैवाहिक महिलेच्या प्रेमात पडतो, असं पाहायला मिळतं. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
They call him OG – हा एक अॅक्शन चित्रपट आहे. त्यामध्ये त्यानं खलनायकाची भूमिका साकारली आहे. ज्याचं नाव ओमकार वर्धमान मिरजाकर (Omkar vardhaman Mirajkar) असं असतं, जो एक गँगस्टर असतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
तस्करी – अलीकडेच ‘तस्करी’ ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली. इमरान खान त्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.





