Bigg Boss Marathi – 6 | उरले फक्त काही दिवस! होणार ‘बिग बॉस मराठी ६’ चा महाअंतिम सोहळा? कोण उचलेल ट्रॉफी?

Bigg Boss Marathi – 6 : ‘बिग बॉस मराठी ६’ चा महाअंतिम सोहळा (Grand Finale) आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. रिपोर्टनुसार, या सीझनचा फिनाले १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. जर बिग बॉसचा यंदाचा फिनाले ‘अक्षय तृतीये’च्या शुभ मुहूर्तावर झाला तर हा सोहळा अधिक भव्य असण्याची शक्यता आहे. कारण १९ तारखेला अक्षय तृतीया आहे. हा विशेष योगायोग ठरणार आहे.
मागील आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. कारण घरातून प्रभू शेळके आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री संकेत पाठक या दोघांनाही बाहेर जावे लागले. प्रभू शेळकेने बाहेर आल्यावर तन्वी कोलते हीच या सीझनची विजेती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा – ‘कृष्णा आर्थिक परिवाराचा ३,१०९ कोटींचा एकूण व्यवसाय’; आ. डॉ. अतुलबाबा भोसले
आज शुक्रवार असल्याने सदस्यांची धावपळ आणि वीकेंडच्या ‘भाऊच्या धक्का’ची तयारी पाहायला मिळेल. रितेश देशमुख उद्या कोणाची शाळा घेणार आणि या आठवड्यात कोण ‘घरचा रस्ता’ धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घरात आता एकूण ८ सदस्य आहेत. यामध्ये तन्वी, अनुश्री, सागर, राखी, राकेश, रेवा, दिपाली, विशाल यांचा समावेश आहे. राकेश बापट, राखी सावंत, सागर कारंडे, अनुश्री माने, विशाल कोटियन, रेवा कौरासे यांच्यात कुणाचे नॉमिनेशन होणार? रिपोर्ट्स (वोटिंग ट्रेंड) नुसार, राकेश बापट आघाडीवर असून अनुश्री माने त्याला तगडी फाईट देत आहे. मात्र, सागर कारंडे आणि रेवा कौरासे यांच्यावर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
‘फॅमिली वीक’ दरम्यान संकेत पाठकची पत्नी सुवर्णा श्याम हिने निरोप घेताना “आता थेट १९ एप्रिलला भेटू” असे म्हटल्याने फिनालेची तारीख हिच असेल, असा अंदाज वर्तवला गेलाय. पण अद्याप ग्रँड फिनलेची अधिक माहिती समोर आलीय.





