Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच दिव्या शिंदेची पहिली पोस्ट व्हायरल, म्हणाली- ‘शांत राहा..नकारात्मकता..’

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी ६ हा सिझन सध्या प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आहे. दर आठवड्याला होणारी एलिमिनेशन प्रक्रिया आणि स्पर्धकांमधील वाद-विवाद यामुळे शोमध्ये रंगत वाढताना दिसतेय. अशातच नुकतीच दिव्या शिंदेच्या शोमधून निरोपानंतर तिने शेअर केलेली पहिली सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच दिव्या शिंदेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने थेट कोणाचंही नाव न घेता, “शांत राहा.. नकारात्मकता पसरवू नका.. स्वतःवर आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा,” असा आशय व्यक्त केला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमधून दिव्या शिंदेला बिग बॉसने बाहेर काढल्यानंतर आता तिने शेअर केलेली पहिली पोस्ट व्हायरल होत आहे. दिव्याने टास्क संपल्यावर घरातील स्पर्धकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिव्याने माफी मागण्यासही नकार दिला होता. याचाच परिणाम म्हणून बिग बॉसने तिला घराबाहेर जाण्यास सांगितलं.

हेही वाचा –  महापालिकेला मिळणार ३०७ कोटींचे अनुदान; केंद्रीय सरकारचा मोठा दिलासा

बिग बॉसच्या घराबाहेर पडताच दिव्याने पहिली पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने आपल्याला खूप काही सांगायचं आहे, असं म्हटलं आहे. आठवड्याचं एलिमिनेशन आधीच ‘बिग बॉस’ने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. याठिकाणी भाऊचा धक्का सुरू होण्याची प्रतीक्षा देखील केली गेली नाही. त्यामुळे तिचे घराबाहेर जाणे घरातील सर्व सदस्यांना एक मोठा धक्काच होता.

दिव्याला त्याआधी ‘बिग बॉस’ने अनेकदा समजावलं होतं. कन्फेशन रूममध्ये राकेश बापटने देखील भावाच्या नात्याने ही गोष्टी सांगितल्या होत्या. पण दिव्याने आपले मत बदलले नाही. शिवाय ती माफी न मागण्यावर अटळ राहिली.

पण आता ती घराबाहेर येताच सोशल मीडियावर इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. दिव्याच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं. त्यामध्ये तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहे. शिवाय सकारात्मक राहण्याबाबत सांगण्यात आले आहे.

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

“आम्ही समजू शकतो की, ‘बिग बॉस मराठी’ शोमधून दिव्या शिंदेची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावुक झालेत तर काहींना धक्का बसला आहे. पण तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्वकाही आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण सर्वांना एक विनंती करतो, कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. आम्हाला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. आम्ही लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि आमची बाजूही मांडू”

थँक्यू! टीम दिव्या शिंदे.

पण स्वत:दिव्या काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button