म्हाळुंगे येथील एमसीएच्या स्टेडियमवर घुमणार अरिजित सिंगचा आवाज; गायकीची जादू अनुभवण्याची सुवर्ण संधी

पुणे : सुरांचा बादशहा म्हणून अरिजित सिंगची ओळख आहे. यंगस्टर्सला त्याच्या गाण्यांनी वेड लावले आहे. अरिजित सिंगच्या लाइव्ह कॅान्सर्टला कायम तुफान गर्दी असते. त्याच्या कॅान्सर्टची तारीख जाहीर होताच तिकिटांवर प्रेक्षक तुटून पडतात. आता अरिजितच्या आवाजाने पुन्हा पुणेकरांचे काळीज धडधडणार आहे. अरिजीत सिंग हा सध्याच्या तरुणांचा आवडता गायक आहे. त्याचं लाईव्ह गाणं ऐकणं अनेकांचं स्वप्न असतं. पुन्हा एकदा पुणे शहरात त्याच्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्याचा लाईव्ह कॅान्सर्ट म्हाळुंगे येथील एमसीएच्या स्टेडियमवर मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.
अरिजितच्या गायकीची जादू अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पण त्यासाठी या कॅान्सर्टच्या प्रायोजकांनी तिकीटं ठेवले आहे. अवघ्या ५९९९ रुपयांपासून ही तिकीटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामुळे कॅान्सर्टला प्रेक्षकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी पार्किंगची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली आहे. तब्बल ५० हजारांहून अधिक संगीतप्रेमी आणि अरिजित सिंगचे चाहते एमसीएच्या स्टेडियमवर संगीताचा आस्वाद घेण्यासाठी जमा होणार आहे.
हेही वाचा – चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिज गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीची आमदार शंकर जगताप यांची मागणी
हा कार्यक्रम १६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून याची तिकीटे www.district.in या वेबसाईटवर बुक करता येणार आहेत. त्यामुळे अरिजित सिंगच्या गाण्यांची जादू अनुवण्यासाठी ही पुणेकरांसाठी सुवर्णसंधी आहे. अरिजित सिंगचे जवळपास सगळीच गाणी ही अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. ‘अपना बना ले’, ‘तुम क्या मिले’, ‘केसरिया’ किंवा तुमचे कोणतेही आवडते गाणे ऐकण्याची ही नामी संधी आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हेरंब शेळके ग्रुपने केले आहे. कार्यक्रमाचे सहप्रायोजक ‘तुबोर्ग’ असणार आहेत. तर हा कार्यक्रम ‘टु बीएचके’ने श्रोत्यांसाठी आणला आहे.