‘राजा शिवाजी’ सिनेमाचा ट्रेलर पाहताच अक्षय कुमारची पोस्ट! करण जोहरने एका शब्दांत दिली प्रतिक्रिया, तर नागराज मंजुळे म्हणाले…

marathi cinema : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल. गेल्या १० वर्षांपासून रितेश या सिनेमासाठी मेहनत घेत होता. या प्रवासात त्याला पत्नी जिनिलीया देशमुखची सुद्धा खंबीर साथ मिळाली. जिनिलीया या सिनेमाची निर्माती आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २० एप्रिल रोजी मुंबईत लॉन्च करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित होताच बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील दिग्गजांनी पोस्ट शेअर करत ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.
अभिनेता अक्षय कुमार, प्रसिद्ध निर्माता करण जोहर, प्रिया बापट, अमृता खानविलकर, अजय देवगण यांसारख्या दिग्गज कलाकारांनी पोस्ट शेअर करत रितेशला ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता अक्षय कुमार – “माझा मित्र रितेश देशमुखला ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी खपू खूप शुभेच्छा! अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्या जबाबदाऱ्या रितेश-जिनिलीयाने पार पाडल्या आहेत…तुमचं मनापासून कौतुक. एवढं मोठं स्वप्न पाहण्यासाठी प्रचंड ध्यास असावा लागतो आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तर त्याहूनही अधिक जिद्द लागते. हा सिनेमा ब्लॉकबस्टर होऊदेत…खूप खूप शुभेच्छा!”
चित्रपट निर्माता करण जोहर – ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा ट्रेलर शेअर करत करण जोहर लिहितो, रितेश- जिनिलीया “अप्रतिम!!!!!”
चित्रपट निर्माता नागराज मंजुळे – “मनापासून अभिनंदन!! भारी!!”
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार – “वर्षानुवर्षांचा ध्यास. आयुष्यभर जपलेलं एक स्वप्न. रितेश, तुझं हे स्वप्न पूर्ण होत असल्याचं पाहून मला प्रचंड आनंद होतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटाला खरोखरच अशा भव्यतेची आणि अशा व्यापक दृष्टीकोनाची गरज होती. हा ट्रेलर अत्यंत प्रभावी आहे आणि प्रत्येक अर्थाने भव्य दिसत आहे. हा चित्रपट खरोखरच खूप खास आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन!”
दिग्दर्शक सुभाष घई – “कल्पना करा, जर ट्रेलर इतका जबरदस्त असेल, तर चित्रपट कसा असेल! चित्रपटगृहांमध्ये एक केवळ जादुई अनुभव…लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुखने साकारलेला आणि ज्योती देशपांडे यांनी ‘जिओ’साठी निर्मित केलेला हा चित्रपट… अत्यंत उत्कटतेने आणि पूर्णपणे राष्ट्रभक्तीच्या ऊर्जेने भारलेला आहे. मला ते स्पष्टपणे दिसून येत आहे. हा चित्रपट उत्कृष्ट ठरावा यासाठी संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मनापासून पाठिंबा दिला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.”
अभिनेता सोनू सूद – “माझा भाऊ…रितेश देशमुख याला ‘राज शिवाजी’ सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा. हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल, भावा. यातील प्रत्येक फ्रेममध्ये तुझे समर्पण आणि कठोर परिश्रम दिसून येतात.”
दिग्दर्शक कूकी गुलाटी – “हे खरोखरच अविश्वसनीय आहे!! ब्लॉकबस्टर!!”
दिग्दर्शक मिलाप झवेरी – “१ मे रोजी, हा चित्रपट संपूर्ण जगभरात ‘महा-ब्लॉकबस्टर’ ठरेल.”
अभिनेत्री सोनाली बेंद्रे – “अभिनंदन…रितेश-जिनिलीयाचं आणि संपूर्ण टीमचं खूप कौतुक. ट्रेलर अप्रतिम आहे! हा चित्रपट साकारण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली आहे हे माहीत असल्यामुळे, हा अनुभव आणखीच विशेष वाटतो! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!”
अभिनेता सिद्धार्थ जाधव – “हर हर महादेव”
गायक अभिजीत सावंत – “व्वा!!!! जय हो!”
दिग्दर्शक केदार शिंदे – “अभिमान… प्रेम.”
अभिनेत्री प्रिया बापट – “रितेश… मी तुम्हाला नेहमीच एक उत्कृष्ट अभिनेता, कलाकार आणि कथा सांगण्याची मनापासून आवड असलेला एक संवेदनशील कथाकार म्हणून पाहिलं आहे. तुमच्या दृष्टिकोनातून साकारलेली, छत्रपती शिवाजी महाराजांची ही अद्भुत गाथा पाहण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे, आणि जिनिलीया तुम्ही प्रेरणादायी कथा आणि चित्रपटांना नेहमीच पाठिंबा देता.. तुमचेही मनापासून आभार. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा… १ मे पासून चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका या सर्व जबाबदाऱ्या रितेश विलासराव देशमुख यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत.





