Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

Shefali Jariwala | प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘कांटा लगा’ या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शेफाली यांच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी (२७ जून) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या शेफाली यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांचे पती, अभिनेता पराग त्यागी यांनी त्यांना तातडीने बेलव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, शेफाली यांचं निधन कार्डियक अरेस्टमुळे झालं आहे.

शेफाली जरीवाला यांनी २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या रिमिक्स म्युझिक व्हिडिओमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या गाण्याने त्यांना ‘कांटा लगा गर्ल’ ही ओळख दिली. त्यांचा ग्लॅमरस लूक, नृत्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यामुळे त्या घराघरात पोहोचल्या. या गाण्याने देशात रिमिक्स म्युझिकच्या नव्या युगाला सुरुवात केली होती. याशिवाय शेफाली यांनी ‘मुझसे शादी करोगी’ सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आणि ‘बिग बॉस १३’, ‘नच बलिए’ यांसारख्या रियालिटी शोमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं.

हेही वाचा     :      वारकऱ्यांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यासह दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये शोक

शेफाली यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. अभिनेता अली गोनी, मीका सिंह, राजीव अदातिया, काम्या पंजाबी यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. मीका सिंह यांनी लिहिलं, “आमची लाडकी कलाकार आणि प्रिय मैत्रीण शेफाली आम्हाला सोडून गेली. यावर विश्वासच बसत नाही.” शेफाली यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, ज्यात त्यांनी सिल्वर जंपसूटमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले होते, सध्या व्हायरल होत आहे.

वैयक्तिक आयुष्य

शेफाली यांचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. त्यांनी संगणक अनुप्रयोगात पदवी प्राप्त केली होती. २००४ मध्ये त्यांनी संगीतकार हरमीत सिंह यांच्याशी लग्न केलं, परंतु २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी अभिनेता पराग त्यागी यांच्याशी लग्न केलं. दोघांचं नातं खूप प्रेमळ आणि मजबूत होतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button