breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ठाकरे गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर, ‘या’ जागेवरून मविआत रस्सीखेच कायम

मुंबई | महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीमध्ये ज्या जागांवर काँग्रेस पक्षही आग्रही होता, तिथेही ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे संजय पाटील खासदार आहेत. काँग्रेसने या जागेवर दावा केला होता. काँग्रेसकडून इथे विशाल पाटील उमेदवार होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत. मात्र, चंद्रहार पाटील यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगलीत जाऊन उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला होता. तर आज संजय राऊतांनी अधिकृतरित्या त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

हेही वाचा    –    ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर

नरेंद्र खेडकर-बुलढाणा, संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम, संजोग वाघेरे पाटील-मावळ, चंद्रहार पाटील-सांगली, नागेश आष्टिकर-हिंगोली, चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर, ओमराजे निंबाळकर-धाराशिव, भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी, राजाभाऊ वाजे-नाशिक, अनंत गीते-रायगड, विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी, राजन विचारे-ठाणे, अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य, संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य, अरविंद सावंत-मुंबई दक्षिण, अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य, संजय जाधव-परभणी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button