breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘भाजप प्रवेशासाठी १० आमदारांची यादी तयार’; भाजप नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई : अजितदादांना भाजपाकडून डावललं जात असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपमध्ये आणखी १० आमदारांच्या प्रवेशाची यादी तयार असल्याचाही मोठा दावा त्यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार हे कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना कधीच कोणी डावलू शकत नाही. परंतु महायुतीत ते सहभागी झाल्याने काहीजण अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच अशी वक्तव्य केली जात आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी मोठे स्थान निर्माण केले होते. आता ते वगळून राष्ट्रवादीमध्ये अंधःकार निर्माण झाला आहे.

त्याची आवश्यकता नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निष्णात वकील आहेत. विधानसभेच्या परंपरा, पद्धती व निकालाचे पालन करून ते योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे बी प्लॅनची आवश्यकता नाही. सरकार इतके भक्कम आहे की २२५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला काही अडचण नाही. याशिवाय रोज अनेकजण पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करतात. १० आमदारांची यादी आजच तयार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – लग्न कधी करणार? गौतमी पाटीलने दिलं उत्तर; म्हणाली..

आमची महायुती आहे. ही युती सन्मानजनक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी NDA मध्ये १३ घटक पक्ष आहेत, त्या सर्वांचा सन्मान ठेवला जाणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधात भाष्य करतात, दुसरीकडे आता शरद पवार व अदानी यांची भेट झाली, यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले I.N.D.I.A आघाडीची भूमिका रोज बदलत आहे. I.N.D.I.A मधील उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदुधर्म हद्दपार करण्याची, संपवण्याची भाषा केली. त्याबद्दल राहुल गांधी यांची काय भूमिका आहे, हे प्रथम जाहीर करावे. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नाही, ते केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या रक्तातच कर्करोग आहे, राहुल गांधी यांनी आधी उदयनिधी यांच्या भूमिकेबद्दल उत्तर द्यावे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button