क्रिडा
-

बुद्धिबळ स्पर्धा: महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीला विजेतेपद
कोल्हापूरच्या सम्मेद शेटेला दुसरा क्रमांक श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा पुणे- महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने स्पर्धेत…
Read More » -

टेनिस स्पर्धा: पार्थ चिवटे, धरणीधर मिश्रा, रोहित शिंदे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस स्पर्धा पुणे– पार्थ चिवटे, रोहित शिंदे, धरणीधर मिश्रा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करूताना…
Read More » -

आयसीसी क्रमवारी : गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम
नवी दिल्ली – आशिया कप सातव्यांदा आपल्या नावावर केल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. रविवारी आयसीसीव्दारे…
Read More » -

संधी मिळाल्यास नेतृत्वासाठी सज्ज- रोहित
नव्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणे आवश्यक दुबई – नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय धाडसी होता.…
Read More » -

एटीकेला घरच्या मैदानावर ब्लास्टर्सचा धक्का
कोलकाता- केरळा ब्लास्टर्सने कट्टर प्रतिस्पर्धी आणि दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेला 20 असा धक्का देत हिरो इंडियन सुपरलीगच्या पाचव्या मोसमात शानदार विजयी सलामी दिली. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ब्लास्टर्सकडून दहा नंबरची जर्सी घालणारा स्लोव्हेनियाचा मॅटेज पॉप्लॅट््निक आणि सर्बियाचा स्लाविसा स्टोजानोविचयांनी गोल केले. डेव्हिड जेम्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्लास्टर्सने दोन्ही गोल उत्तरार्धात नोंदविले, पण त्याआधी पूर्वार्धात चालींचा धडाका रचत त्यांनीमानसिक लढाई जिंकली होती. ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंह याने आयएसएल पदार्पणात क्लीन-शीट राखत विजयात मोलाचे योगदान दिले. 77व्या मिनिटाला स्टोजानोविचने चपळाईने हालचाली करीत डाव्या पायाने फटका मारला. त्यावेळी एटीकेच्या गेर्सन व्हिएराने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पणदक्ष पॉप्लॅट््निकने प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकविच अफलातून हेडिंग केले. मग चार मिनिटे बाकी असतान स्टोजानोविचने गोल नोंदविण्याचा पराक्रम केला.हालीचरण नर्झारी याने ही चाल रचली. स्टोजानोविचने चेंडूवर व्यवस्थित ताबा मिळवित नेटच्या उजव्या कोपऱ्यात फटका मारला. एटीकेचा गोलरक्षक अरिंदमभट्टाचार्य झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही. पूर्वार्धात ब्लास्टर्सने पहिली संधी निर्माण केली. चौथ्या मिनिटाला लालरुथ्थाराने डाव्या बाजूने डाव्या पायाने मॅटेज पॉप्लॅट््निकच्या दिशेने चेंडू मारला, पण मॅटेजचाहेडिंगचा प्रयत्न चुकला. सहाव्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या साहल अब्दुल समदने मॅटेजच्या दिशेने चेंडू मारला. मॅटेजचा फटका एटीकेच्या जॉन जॉन्सन याने ब्लॉककेला, पण अचूकतेअभावी चेंडू ब्लास्टर्सच्या हालीचरण नर्झारीकडे गेला. त्याने चेंडू मारला, पण एटीकेच्या मॅन्युएल लँझरॉतला फाऊल करण्यात आले. नवव्या मिनिटाला लालरुथ्थाराने डावीकडून घोडदौड करीत मॅटेजला पास दिला, पण जॉन्सनने एटीकेचे क्षेत्र सुरक्षित राखल. 12व्या मिनिटालासेटप्लेवर मॅटेजने नेमांजा लॅकीचपेसिचला पास दिला. नेमांजाने सुंदर किक मारत एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यला चकविले, पण दक्षसेना राल्टेने चेंडू हेडींगकरवी बाजूला घालविला. 16व्या मिनिटाला एटीकेच्या बलवंत सिंगचा प्रयत्न ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंगने अपयशी ठरविला. 19व्या मिनिटाला लालरुथ्थाराने निर्माणकेलेल्या संधीचा सैमीनलेन डुंगलला फायदा उठविता आला नाही. 20व्या मिनिटाला यंदाच्या मोसमातील पहिले यलो कार्ड एटीकेच्या अल मैमौनी नौसैरलादाखविण्यात आले. त्याने मॅटेजला पाठीमागून ओढले. एटीकेला पहिला प्रयत्न नोंदविण्यासाठी 26व्या मिनिटापर्यंत प्रतिक्षा करावी लागली, पण एव्हर्टन सँटोसने घोडदौड करीत मारलेला क्रॉसबारवरूनबाहेर गेला.33व्या मिनिटाला समदचा जोरदार पटका भट्टाचार्यने अडविला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती.
Read More » -

सिद्धी आचरेकर, वैभव दहीभाते यांना अव्वल मानांकन
एकम जिल्हा टेबल टेनिस स्पर्धा पुणे – एकम स्पोर्टस क्लबच्या वतीने जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला उद्या (रविवार) प्रारंभ होत…
Read More » -

अंपायरने केदारला हाताची पट्टी काढायला लावली, हे योग्य आहे का ?
भारतीय संघाने काल रात्री बांगलादेशला अंतिम सामन्यात पराभूत करत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. या विजयात पुण्याच्या केदार जाधवचा मोठा हात…
Read More » -

इंडीयन सुपर लीगच्या नव्या हंगामाची सुरुवात आज पासून
एटीके आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात पहिला सामना कोलकाता– हिरो इंडियन सुपर लिगला 2014 मध्ये प्रारंभ झाल्यापासून एटीके आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात…
Read More » -

शेवटच्या चेंडूवर विजय, भारताने आशिया चषक जिंकला!!!
दुबई– येथे सुरु असलेल्या आशिया चषकाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला नमवत आशिया चषकावर पुन्हा आले नाव कोरले. शेवटच्या चेंडूवर सामन्याचा…
Read More » -

भारताकडून पराभूत झाल्याने झोप उडाली – सर्फराज अहमद
नवी दिल्ली- आशिया चषक स्पर्धेत भारताकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर मला झोप लागलेली नाही, असे वक्तव्य पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने केले…
Read More »









