उद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिले ‘‘ड्रोन क्लस्टर’’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

उद्योग विश्व: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स उद्योग विभागाकडे पाठपुरावा करणार!

पुणे | पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक क्षेत्राला नवे बळ देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) राज्यातील पहिले ड्रोन क्लस्टर तसेच खाद्यप्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टर उभारण्याचे पुढाकार घेतले आहे.

दररोज वाढत चाललेल्या ड्रोन उद्योगाला चालना देण्यासाठी उभारले जाणारे हे राज्यातील पहिले औद्योगिक क्लस्टर असेल. सध्या एमसीसीआयए दोन्ही क्लस्टरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी लवकरच सादर करणार आहे. नियोजनानुसार, मार्च २०२७ अखेरपर्यंत या दोन्ही क्लस्टर कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यात सुमारे २०० सूक्ष्म व लघुउद्योजकांना थेट फायदा होईल. या क्लस्टरमध्ये उद्योगांना चाचणी सुविधा, संशोधन व विकास, प्रारूप आराखडा, बाजारपेठेत विक्रीपूर्वी उत्पादन सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया उद्योगात पदार्पण करणाऱ्या उद्योजकांना पाठबळ मिळेल.

हेही वाचा     :          देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपा कुठे होता? संजय राऊतांचा सवाल

ड्रोन क्लस्टर म्हणजे काय?

पिंपरी औद्योगिक वसाहतीत उभारले जाणारे ड्रोन क्लस्टर हे ड्रोन आणि त्याच्या सुट्या भागांसाठी आवश्यक आरेखन, संशोधन, चाचणी व संबंधित तंत्रज्ञानाशी निगडित उद्योगांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देईल. संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि वाहतूक क्षेत्रातील ड्रोन वापर वाढत असल्यामुळे या क्लस्टरमुळे राज्यातील ड्रोन उद्योगांना महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे.

हडपसरमध्ये खाद्यप्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टर…

हडपसर येथील चेंबरच्या कार्यालयात उभारले जाणारे खाद्यप्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टर कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी एकात्मिक सुविधा केंद्र ठरेल. गुणवत्ता तपासणी, निर्यातीसाठी प्राथमिक चाचणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देणे या क्लस्टरचे उद्दिष्ट आहे. मराठा चेंबरकडून उद्योग विभागाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची अंतिम मंजुरी, निधी वाटप, यंत्रसामुग्रीसाठी निविदा प्रक्रिया, सॉफ्टवेअर व मनुष्यबळाची व्यवस्था व तज्ज्ञांची निवड अशा टप्प्यांनंतर प्रकल्पाला सुरूवात मिळेल. एमसीसीआयएच्या मते, हा प्रकल्प राज्यातील लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी नवीन वाटा शोधण्यास मोठा हातभार लावणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिले ड्रोन क्लस्टर व खाद्यप्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टर उभारणे हे औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा टप्पा ठरणार आहे. यामुळे लघु व सूक्ष्म उद्योगांना नवसंभावना मिळतील, रोजगार निर्मिती होईल आणि या क्षेत्रातील नवोद्योगांना चालना मिळेल. आम्ही या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे. ड्रोन उद्योग क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांसाठी हे सुवर्णसंधी ठरेल.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button