Breaking-news

पिंपळे सौदागरमध्ये झाड कोसळून नागरिक गंभीर जखमी; नाना काटे यांच्याकडून तात्काळ मदत

पिंपरी-चिंचवड | मुसळधार पावसामुळे पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील सौदागर हॉटेलसमोर मोठे झाड कोसळून एक नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल आयकॉन रोड परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अचानक मोठे झाड कोसळले. यामध्ये श्री. एस. एन. गुडाळे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तात्काळ मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाना काटे यांनी तत्काळ पोलीस, अग्निशमन दल तसेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. याशिवाय रुग्णवाहिकाही घटनास्थळी रवाना करण्यात आली. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून जखमी श्री. गुडाळे यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने पिंपळे सौदागर येथील जीवन ज्योती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाना काटे यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button