breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आमदार निधीत मोठी वाढ, आता पगारही पूर्ण मिळणार; अजित पवारांची घोषणा

मुंबई – कोरोना संकट काळात आमदारांच्या वेतना कपात करण्यात आली होती. आमदारांच्या वेतनात 30 टक्क्यांनी केलेली कपात आता मागे घेत 1 मार्चपासून त्यांना पूर्ण पगार मिळणार असल्याची घोषणा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.

वाचा :-शेती, पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करणार – अजित पवार

कोरोनाच्या काळात राज्यावरील आर्थिक संकट पाहता आमदारांच्या पगारात कपात करण्यात आली होती. आमदारांच्या पगारातील 30 टक्के रक्कम ही गेल्या वर्षभरापासून कपात होत होती. आता एका वर्षानंतर त्यांचा पगार पूर्ववत केला जाणार आहे. या काळात आमदारांनी 30 टक्के यानुसार वर्षभरामध्ये 7.5 लाख रूपये इतकी आर्थिक मदत केली आहे.

आमदारांच्या पगाराबरोबरच आमदार निधीत देखील वाढ करण्यात आल्याची घोषणा अजित पवारांनी केली. आमदार निधी तीन कोटी रुपयांहून 4 कोटी रुपये करण्यात आला आहे.याआधी आमदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी 3 कोटी रुपये निधी मिळत असे. यात आता 1 कोटींनी वाढ करून, हा निधी 4 कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 350कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button