breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

काळजी घ्या! मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने गाठला आजवरचा उच्चांक

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे आपण सर्वांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविण्यात आली. राज्यात गुरुवारी दिवसभरात 35,952 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर मुंबईत 5,504 नव्या रुग्णांची भर पडली. कोरोना संकट सुरू झाल्यापासून राज्यातील आणि मुंबईतील नव्या रुग्णांचा हा उच्चांक आहे.

काल आढळलेल्या 35,952 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या 26,00,833 वर पोहोचली आहे. तर काल 95 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आणि 20,444 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील कोरोनाबळींचा आकडा 53,795 इतका झाला असून आतापर्यंत 22,83,037 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 2,62,685 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईत काल दिवसभरात तब्बल 5,504 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 2,281 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,८०,1१५ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,620 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 3,33,603 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 33,961 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 6,426 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,94,393 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 8,294 इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत 4,35,859 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 50,240 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button