breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Asia Cup 2023 स्पर्धेच्या सर्व सामन्यांच्या वेळा जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

Asia Cup 2023 : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व क्रिकेट प्रेमी आशिया कपची आतुरतेने वाट पाहत असतात. आता याच स्पर्धेच्या संपूर्ण मॅचेसचे टायमिंग जाहीर झाले आहे. आशिया चषक २०२३ या स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी आशिया चषक एकदिवसीय (५० षटकांच्या) स्वरूपात खेळवला जाणार आहे. तसेच आशिया कपमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे.

आशिया कपमध्ये सहभागी होणाऱ्या सहा संघांची ३-३ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-४ स्टेजचा समावेश असेल.दोन देशांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तानातील लाहोर येथे होणार असून अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो, श्रीलंकेत होणार आहे.

हेही वाचा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील ‘या’ ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश

सहा संघांची गट विभागणी :

गट अ : भारत, पाकिस्तान, नेपाळ
गट ब : बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका

आशिया कपची टायमिंग आणि वेळापत्रक :

३० ऑगस्ट : पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतानमध्ये दुपारी ३.०० वाजता (ग्रुप स्टेज)
३१ ऑगस्ट : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, दुपारी ३.०० वाजता (ग्रुप स्टेज) कॅंडीमध्ये
२ सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध भारत, दुपारी ३.०० वाजता कँडी (ग्रुप स्टेज)
३ सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोरमध्ये दुपारी ३.०० वाजता (ग्रुप स्टेज)
४ सप्टेंबर : भारत विरुद्ध नेपाळ, दुपारी ३.०० वाजता कँडी (ग्रुप स्टेज)
५ सप्टेंबर : अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, दुपारी ३.०० वाजता लाहोर (ग्रुप स्टेज)
६ सप्टेंबर : लाहोरमध्ये A१ वि B२, दुपारी ३.०० (सुपर ४)
९ सप्टेंबर : कोलंबोमध्ये B१ वि B२, दुपारी ३.०० (सुपर ४)
१० सप्टेंबर : कोलंबोमध्ये A१ वि A२, दुपारी ३.०० (सुपर ४)
१२ सप्टेंबर : कोलंबोमध्ये A२ वि B१, दुपारी ३.०० (सुपर ४)
१४ सप्टेंबर : कोलंबोमध्ये A१ वि B१, दुपारी ३.०० (सुपर ४)
१५ सप्टेंबर : कोलंबोमध्ये A२ वि B२, दुपारी ३.०० वाजता (सुपर ४)
१७ सप्टेंबर : कोलंबोमध्ये अंतिम सामना दुपारी ३.०० वाजता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button