breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत तब्बल 11,163, पुण्यात 12,494 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अशी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात आणि मुंबईत रविवारी दिवसभरात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविण्यात आली. काल दिवसभरात राज्यात तब्बल 57,074 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 222 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 27,508 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30,10,597 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 55,878 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 25,22,823 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 4,30,503 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 11,163 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 5,263 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 4,52,445 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,776 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 3,71,628 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 68,052 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात रविवारी तब्बल 12,494 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5,76,758 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 64 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 10,227 इतका झाला आहे. तसेच काल 8,483 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 4,86,958 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 6,225, पिंपरी-चिंचवडमधील 3,382 आणि 2,887 ग्रामीण व कंटेनमेंट झोनमधील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button