breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

मोठी बातमी! चीनच्या नव्या नकाशात अरूणाचल प्रदेशचा समावेश

China New Map : चीनने नुकताच नवा नकाशा जारी केला आहे. यामध्ये भारताचा भाग असणाऱ्या अरूणाचल प्रदेशवर चीनने पुन्हा एकदा दावा केला आहे. अरूणाचल प्रदेश आणि अक्साई चीन, तैवान आणि साऊथ चीनचा सागरीकिनारा चीनचा भाग असल्याचं नकाशात दाखवलं आहे.

चीनच्या स्टॅण्डर्ड मॅप सर्व्हिस या संकेतस्थळावर नैसर्गिक संसाधन खात्याकडून चीनचा २०२३ चा अधिकृत नकाशा लॉन्च करण्यात आला. हा नकाशा चीन आणि जगातील इतर देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीवर आधारीत आहे, असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. जाहीर झालेल्या नव्या नकाशात अरुणाचल प्रदेश, दक्षिण तिबेट, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण सागरी भाग दाखवण्यात आले आहेत.

हेही वाचा – भाजपकडून सर्व हेलिकॉप्टर्स बुक, डिसेंबरमध्येच निवडणुका? ममता बॅनर्जींचा मोठा दावा

यापुर्वी चीनने एप्रिल २०२३ मध्ये आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या ११ जागांचं नामकरण केलं होतं. गेल्या पाच वर्षांत चीनने असा प्रकार तीनवेळा केला आहे. याआधी २०२१ मध्ये चीनने १५ जागांचे तर, २०१७ मध्ये सहा जागांचं नामकरण केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button