breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

खुशखबर! पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आजपासून अर्जविक्री-स्वीकृती

पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आज, मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार आज दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २९ सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे तर १८ ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे. मार्चमध्ये पुणे मंडळाने सुमारे ६ हजार घरांची सोडत काढली होती.

त्यानंतर आणखी एक सोडत काढण्याचे जाहीर करून त्यानुसार तयारी सुरू केली होती. अनेक दिवसांपासून इच्छुकांना या सोडतीची प्रतीक्षा होती. अखेर मंडळाने मंगळवारी ५ हजार ८६३ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी १२ वाजल्यापासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे.

हेही वाचा – World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी?

अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता सोडत काढली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button