breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संतापजनक! काँग्रेसचे माजी आमदाराच्या मुलाची कोविड केंद्रावरील डॉक्टरला मारहाण

गडचिरोली |

कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोविड केंद्र येथे  कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना आज मारहाण केल्याने आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. गुंड प्रवृतीचा लारेन्स गेडाम याने कोविड सेंटर वर जाऊन येथे मागील दोन महिन्यापासून कोविड केंद्रातच मुक्काम करून रुग्णांना सेवा देणारे युवा डॉ. अभिजित मारबते यांच्या सोबत कारण नसताना मारहाण केली आहे. या केंद्रात डॉ अभिजित मारबते हे सतत काम करीत आहेत. त्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता तसेच केंद्रात राहून रुग्णाची अहोरात्र सेवा करीत आहेत.

कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा हा गुंड प्रवृतीचा असून विधान सभा निवडणुकीत त्याच्यावर उमेदवार बग्गु ताडाम यांचे अपहरण करण्याचा गुन्हा लारेन्स गेडाम वर दाखल झाला आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार आनंदराव गेडाम यांना मुलासह पूर्ण पूर्ण निवडणूक प्रचार होई पर्यंत फरार व्हावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने यांचा जामीन नाकारल्याने ते स्वतहून कोर्टात हजर झाले. लारेन्स गेडाम हा जामीनावर आहे.हे विशेष. गुंड प्रवृतीचा लारेन्स गेडाम याचेवर तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस स्टेशन आरमोरी येथे नागरिक पोहचले आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी,डॉक्टर,नर्स हे संपावर जाण्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button