Breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रशांत शेट्टी प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 

 
– 15 ऑगस्ट 2019 पर्यंत इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – प्रशांत शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने यंदा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये होणा-या सामुदायिक सोहळ्यात 101 विवाह होणार असून इच्छुकांनी 15 आगस्टपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी व स्वागताध्यक्ष नगरसेवक विजय शिंदे यांनी केले आहे. 
या विवाह सोहळ्यात सहभागी वधुवरांना प्रतिष्ठानकडून मोफत संसारोपयोगी साहित्य, वधुवरांना पोषाख, वधुचे दागिने, हारफुलांसह पत्रिका देण्यात येतात.  नोंदणीसाठी वधुवरांचे दोन फोटो, जन्मतारखेचा पुरावा, आधारकार्ड आणि घरातील दोन साक्षीदारांचे पुरावे हे प्रतिष्ठानचे कार्यालय प्रशांत शेट्टी प्रतिष्ठान, स्कायहिल अपार्टमेंट, आयडीबीआय बँकेजवळ, मुंबई पुणे महामार्ग, चिंचवड पुणे 19 येथे जमा करावेत.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी दि. 15 ऑगस्ट 2019 पर्यंत माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी – 9923203680 व स्वागताध्यक्ष नगरसेवक विजय ऊर्फ शीतल शिंदे -9850905033 (कार्यालय पत्ता : श्रीधर अपार्टमेंट, शॉप नं.3, श्रीधरनगर, चिंचवड पुणे 33) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button