Breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापालिका अतिक्रमण विभागासाठी 30 होमगार्ड, 60 लाख रुपये खर्चास स्थायीची मान्यता 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –   पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाच्या वतीने कारवाईसाठी 30 होमगार्ड घेण्यात आले आहेत. त्यांना एका दिवसासाठी 670 रूपयांप्रमाणे 25 दिवसांसाठी 16 हजार 750 रूपये दरमहा दिले जाणार आहेत. त्यासाठी वर्षाला पालिका 60 लाख 30 हजार रूपये खर्च आहे.  या खर्चास स्थायी समिती सभेने बुधवारी (दि.19) मंजुरी दिली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त अत्यावश्यक असतो. त्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. एक जून 2019 ते 10 मे 2020 पर्यंत 21 पुरूष व 9 महिला होमगार्ड उपलब्ध झाले आहेत.

होमगार्डला प्रति दिवस 670 रूपये मानधन दिले जाणार आहे. असे एकूण 30 होमगार्डसाठी महिन्यांचे 25 दिवस धरून वर्षभरासाठी 60 लाख 30 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत पोलिसांसोबत आता होमगार्ड दिसणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button