उद्या बाळासाहेब ठाकरे पुरस्कार वितरण सोहळा
पिंपरी, (महाईन्यूज) – आद्य क्रांतीकारक लहुजी साळवे मातंग शक्ती व शिवशक्ती महासंघ, साहित्यिक अणा भाऊ साठे समाजसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हिंदु-हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार प्रदान सोहळा उद्या बुधवारी (दि. 19) पार पडणार आहे, अशी माहिती आयोजक संतोष पवार यांनी दिली.
शिवसेना वर्धापन दिन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्त महाराणा प्रताप व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती वर्षाप्रित्यर्थ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार आहे. हा सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात बुधवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. अशी माहिती निमंत्रक संजय पवार आणि आयोजक संतोष पवार यांनी दिली.