मोदी कॉंग्रेसला धमकी देताहेत – मनमोहन सिंग
- मनमोहन सिंग यांची राष्ट्रपतींकडे तक्रार
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉंग्रेसला धमकावत असल्याची तक्रार मनमोहन सिंग आणि इतर कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. कर्नाटकमधील प्रचारसभेत भाषण करताना मोदी यांनी कॉंग्रेसला “लेने के देने पड जाएंगे’ अशा शब्दांत धमकावले असल्याची तक्रार कॉंग्रेसजनांनी केली आहे. मोदींच्या या शब्दांवर कॉंग्रेसने जोरदार हरकत घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी हुबळी येथील भाषणात या शब्दांचा वापर केला होता.
भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्या विरुद्ध बिनबुडचे आरोप करत राहणाऱ्या कॉंग्रेसवर प्रतिहल्ला चढवताना मोदी यांनी नॅशनल हॅरोल्ड प्रकरणाचा उल्लेख करत कॉंग्रेसवर प्रतिहल्ला चढवला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांवरही आरोप असून ते जामिनावर असल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी केला.
ज्या पक्षाचे प्रमुख जामिनावर आहेत, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत असे सांगून मोदी यांनी पुढे म्हटले होते, की मी मोदी आहे. जर मर्यादा सोडाल तर लक्षात ठेवा, “लेने के देने पड जाएंगे’. त्यांच्या याच शब्दांवर कॉंग्रेसजनांनी हरकत घेतली आहे. आणि तशी चिठ्ठी राष्ट्रपत रामनाथ कोविंद यांना लिहिली आहे.