काही दिवसांतच मनसेचे चित्र बदललेले दिसेल – सचिन चिखले
- मोरवाडीत शहर मनसेचा मेळावा उत्साहात
- राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनांची दिली माहिती
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मुंबईतील कृष्णकुंजवर राज साहेबांनी नुकतीच बैठक घेतली. आपण सर्वांनी मिळून ताकद द्यावी, असे त्यांनी आवाहन केले आहे. येणा-या काही दिवसात शहरातच नव्हे तर राज्यभरात मनसेचे चित्र बदललेले असेल, असा विश्वास त्यांनी दिला आहे. अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांना बैठकीत दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवारी (दि. 28) गुडीपाढवा मेळावा व लोकसभा निवडणूक तयारी या विषयावर मोरवाडीतील एका हॉटेलमध्ये मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी मान्यवरांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. सर्व विंगचे शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
चिखले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका निश्चित करण्यासाठी राजसाहेब बैठक घेणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे याबाबत निर्णय होणार आहे. यासंदर्भात 1980 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना खुला पाठिंबा दिला होता. याची आठवण देखील राजसाहेबांनी करून दिली आहे. त्यामुळे आपली भूमिका इतर पक्षापेक्षा वेगळी असणार आहे. सर्वांनी एकदिलाने कामाला लागण्याच्या सूचना आहेत, असेही चिखले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
हेमंत डांगे म्हणाले की, राजसाहेब जे काही करतील ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच असणार आहे. मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी येण्याचे सर्वाना त्यांनी आवाहन केले आहे.