breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला; एक जवान शहीद
दंतेवाडा (छत्तीसगड) – दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोट आणि गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा तर 5 जण जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) सायंकाळी घडली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या 231 बटालियनचे एक पथक राज्य पोलिसांच्या एका पथकाबरोबर दंतेवाडा जिल्ह्यातील आरनपूर क्षेत्रात कार्यरत होते. त्याचदरम्यान आयईडी स्फोट झाला आणि त्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. स्फोट आणि गोळीबारात 6 जवान जखमी झाले. त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला. ही घटना आज सांयकाळी साडेचारच्या सुमारास निमलष्करी बलाच्या कमाल चौकीजवळ घडली. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.