breaking-newsमहाराष्ट्र
भामरागडमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : गडचिरोलीतील भामरागडमधील ताडगाव जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांच्यात आज (२२ एप्रिल) चकमक झाली. या चकमकीत १३ नक्षवाद्यांना कठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये जहाल नक्षलवादी साईनाथ आणि सिनूचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. चकमकीनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
ताडगाव जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यापूर्वी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले होते